‘यामुळे’ महाविकास आघाडी सरकार आपल्या ओझ्यानेच पडेल

माय वेब टीम 

पुणे -  राज्य सरकारमधील मंत्र्यांची निष्क्रियता आणि वाढता भ्रष्टाचार यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे आपल्या ओझ्यानेच पडणार आहे, त्याला दुसर कोणी पाडण्याची आवश्यकता नाही असे भाकीत भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वर्तवले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पुणे विद्यार्थी गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सारथी संस्था अशा विविध विषयांबाबत त्यांनी भाष्य केले.

पुनर्विचार याचिका दाखल करणार

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. हे सरकार काही करेल असं वाटत नाही. त्यामुळे आता मीच सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. त्याची तयारीही सुरू केली आहे, असं त्यांना सांगितलं. सरकारच्या अनास्थेमुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. ओबीसी आरक्षणाचंही तेच झालं. त्यामुळे सरकार विरोधात वातावरण आहे. सरकारला हेच करायचं होतं का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

राज्यात मराठा किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलना बाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.समाजासाठी होत असलेल्या या आंदोलनाना आणि मागण्यांना पाठींबा असून सरकार याबाबत काय करणार समजायला तयार नाही. कोणीतरी तिसराच माणूस पुढे येवून याबाबत जनतेला माहीती देतो पण सरकार याबबात धाडसाने सांगण्यास पुढे येत नाही याचे आश्चर्य वाटते.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निर्णयानंतर सरकारने प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होते. त्यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र, ते न करता सर्व काही केंद्र सरकारवर ढकलंत आहे. काहीही झालं की केंद्र सरकारवर ढकलायचं ही आता फॅशन झाली आहे. त्यामुळेच मी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असं ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post