SRKचे नाव आजीने ठेवले होते ‘अब्दुर रहमान’, जाणून घ्या नावामागची रंजक कहाणी

 


माय वेब टीम 

बॉलिवूडचा बादशाह किंवा किंग खान म्हणून शाहरुख खान ओळखला जातो. शाहरुखचे लाखो चालते आहेत. त्याचे चाहते त्याला एसआरके बोलतात. पण त्याच्या नावाबद्दलची एक रंजक कहाणी शाहरुखने सांगितली आहे. शाहरुखने सांगितलं की त्याच्या आजीने त्याला वेगळं नाव दिलं आहे. शाहरुखच्या आजीन त्याचे अब्दुर रहमान असे नाव ठेवले. मात्र, त्याचे हे नाव कोठेही नोंदवले नाही. परंतु त्याच्या आजीची इच्छा होती की तिच्या नातूला त्या नावाने सगळ्यांनी ओळखावे. यावर विनोद करत शाहरुख म्हणाला , ” ‘बाजीगर’ या चित्रपटाच्या अभिनेत्याचं नाव हे अब्दुर रहमान आहे असे कोणी म्हणालं तर ऐकून फार आश्चर्य वाटतं,” असे शाहरुख एका मुलाखतीत म्हणाला आहे.

शाहरुखने अनुपम खेर यांच्या ‘द अनुपम खेर शो’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने त्याच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. शाहरुखचे नाव त्याचे वडील मीर ताज मोहम्मद खान यांनी ठेवले आहे. शाहरुखच्या नावाचा अर्थ हा राजकुमार सारखा चेहरा असलेला मुलगा असा आहे.


अनुपम खेर यांच्या शोमध्ये हा मजेदार किस्सा तेव्हा समोर आला जेव्हा त्यांनी शाहरुखला प्रश्न विचारला की “तू कोणत्या अब्दुल रहमान नावाच्या कोणत्या व्यक्तीला ओळखतोस का?” या वर शाहरुख म्हणाला, “मी कोणाला ओळखत नाही, माझी जी आजी होती…आणि त्यांनी लहानपणी माझं नाव अब्दुर रहमान ठेवलं होतं.”

शाहरुख पुढे म्हणाला, “जेव्हा मी थोडा मोठा झालो होतो, तेव्हा माझे चुलत भाऊ मला चिडवायचे आणि बोलायचे की जेव्हा तू लग्न करशील तेव्हा आम्ही हे गाणं गाऊ- अब्दुर रहमान की मै अब्दुर रहमानिया. हे एक जुनं गाणं होतं.”

शाहरुख पुढे म्हणाला की “माझ्या वडिलांनी माझे नाव शाहरुख ठेवले ज्याचा अर्थ राजकुमार सारखा चेहरा असणारा. तर, मी त्याचा अर्थ थोडा बदलला, मी त्याला प्रिन्स चार्ल्ससारखा चेहरा असणारा असा त्याचा अर्थ केला, कारण माझे नाक थोडं मोठं आहे. तर माझ्या बहिणीचं नाव हे लाला रुख आहे.”

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post