पहिल्यांदा सेक्स करताना कोणती काळजी घ्याल ? तर जाणून घ्या

 


माय अहमदनगर वेब टीम

हेल्थ डेस्क - पहिल्यांदा सेक्स करणं ही माणसाच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. कारण, त्यांनतर त्याचं आयुष्यदेखील बदलून जातं. असे बरेच लोक आहेत, जे पहिल्यांदा सेक्स केल्याचा अनुभव विसरत नाहीत. प्रथमच सेक्स करणं म्हणजे आपले कौमार्य गमावणं. 

पहिल्यांदा सेक्स करताना महिला किंवा पुरुष आपले कौमार्य गमावतो, त्यामुळे पहिल्या सेक्सचा अनुभव बर्‍याच लोकांना त्रासदायक ठरू शकतो. प्रथमच सेक्स केल्याने प्रायव्हेट पार्टसना दुखापत होऊ शकते आणि ती वेदनादायक ठरू शकते. यासाठी प्रथमच संभोग करण्यापूर्वी, स्त्रियांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. 

पहिल्यांदा सेक्स करणं थोडंस वेदनादायक असू शकतं, पण, त्रास न होता सेक्सचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला उतावीळपणा किंवा घाई न करता सेक्स करणं गरजेचं आहे. 

पहिल्यांदा सेक्स करताना हळू हळू सेक्सचा अनुभव घ्या. पहित्यांदा सेक्स करताना अति उत्साह आणि उत्तेजनामुळे खाजगी भागाचे स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे लैंगिक क्रिया अधिक अवघड वाटू लागते. त्यामुळे अतिघाई करून नका.

पहिल्यांदा सेक्स करताना एक अस्थिर हायमनदेखील वेदना देऊ शकतात. हायमेन हा महिलांच्या योनीचा बाह्य थर आहे, जो पहिल्यांदा सेक्स वेळी फाटू शकतो. पण, विविध प्रकारच्या शारीरिक हालचालींमुळे बर्‍याच स्त्रियांचे हायमेन आधीच तुटलेले असते. 

पहिल्यांदा सेक्स करण्याआधी स्त्रियांनी बोटांच्या सहाय्याने हायमेन थोडे ताणने फायद्याचे ठरू शकते. यासाठी आपण ल्युबचादेखील वापरू शकता.

एखादी स्त्री उत्साहित होते, तेव्हा तिचा प्रायव्हेट पार्ट नैसर्गिकरित्या ल्यूब्रिकेट होतो. या प्रकरणात, लैंगिक वेदना कमी करण्यासाठी प्रथमच फोर प्ले करा. 

फोर प्ले केवळ वेदनाच कमी करतो असे नाही, तर दोन जीवांना शरीराने आणि मनानेही जवळ आणतो. या क्रियेत दोघांच्या आवडीनिवडी समजतात तसेच संभोगापेक्षा फोर प्ले मुळेच स्त्रिया अधिक उत्तेजित होतात. त्यामुळे त्यानंतर संभोगाचा आनंद दोघेहीजण वेदनारहितपणे घेऊ शकतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post