मेहुल चोक्‍सीची गर्लफ्रेंडला अनेक आमिषं! हॉटलमध्‍ये रुम बुक करतो, विमानाचेही तिकिट काढतो आणि बरचं काही!

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्‍ली - पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्‍या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्‍सी याच्‍याबाबत अनेक खुलासे त्‍याची कथित गर्लफ्रेंड बारबरा जाबरिका हिनेच केले आहेत. माझ्‍याशी जवळीक साधण्‍यासाठी मेहुल याने मला अनेक आमिष दाखवली. मात्र मी त्‍याला बळी पडले नाही, त्‍याच्‍या सर्व मी ऑफर धुडकावल्‍या, असा दावाही तिने माध्‍यमांसमोर केला आहे. तसेच त्‍याने मला दिलेली हिर्‍याची अंगठी आणि ब्रेसलेटही बनावट होते, असेही तिने स्‍पष्‍ट केले आहे. 

भारतातून फरार झालेला चोक्‍सी सध्या डॉमनिकाच्या तुरुंगात आहे. त्‍याची गर्लफ्रेंड बारबरा जाबरिक हिने प्रथम मौन सोडले आहे. बारबरा हिनेच मेहुलचे अपहरण केले, असा आरोप त्‍याच्‍या पत्‍नीने केला होता. हा रोप बारबराने धुडकावला आहे. 'मला मेहुल चोक्‍सीचे अपहरण करण्‍याची गरजच काय, असा सवाल करत तोच माझ्‍या मागे लागला होता. हॉटलमध्‍ये रुम बुक करतो, विमानाचेही तिकिट काढतो', अशी अनेक आमिष त्‍याने मला दाखवली होती. मात्र मी त्‍याच्‍या सर्व ऑफर फेटाळल्‍या. जॉली हार्बर हे अत्‍यंत सुरक्षित असे ठिकाण आहे. येथून कोणाचेही अपहरण करणे अशक्‍यच आहे. मला मेहुलकडे असणार्‍या संपती आणि पैशात काडीचाही रस नाही, असेही तिने म्‍हटलं आहे. 

बाेगस नावाने मैत्री... भेट दिलेली हिर्‍याची अंगठी, ब्रेसलेटही बनावट 

बारबराने दावा केला आहे की, मेहुलने पहिल्‍या भेटीत स्‍वत:चे नाव राज आहे, असे सांगितले होते. विशेष म्‍हणजे त्‍याला ओळखणारेही त्‍याला राज नावानेच ओळखत होते. आमची मैत्री झाली. मी त्‍याच्‍याबरोबर सायंकाळी फिरायला जात होते. दोघेही कॉफी शॉपमध्‍येही जात असू. तसेच अनेकवेळा दोघांनी रात्रीचे जेवणही एकत्र घेतले आहे. यानंतर मेहुलने माझ्‍याशी जवळीक करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याने मला हिर्‍याची अंगठी आणि ब्रेसलेट दिले.

यानंतर हॉटेलमधील रुम बूक करतो, विमानेच तिकिटही काढून देतो, अशा ऑफर त्‍याने मला दिल्‍या. त्‍याच्‍याबरोबर केवळ मैत्री ठेवण्‍याची माझी इच्‍छा असल्‍याने मी त्‍याच्‍या सर्व  ऑफर फेटाळल्‍या. हे नाते मर्यादीत ठेवण्‍याचा निर्णय मी घेतला होता. कारण  मैत्री अधिक वाढवली असती तर अपेक्षा वाढल्‍या असत्‍या आणि सर्वांनी मलाच दोषी ठरवलं असतं, असेही बारबराने स्‍पष्‍ट केले आहे. तसेच त्‍याने मला दिलेली हिर्‍याची अंगठी आणि ब्रेसलेटही बनावट असल्‍याचे नंतर माझ्‍या लक्षात आले, असेही तिने सांगितले. 

चोक्‍सी अँटिग्वामध्‍ये सुरु करणार होता हॉटेल आणि क्‍लब 

मी मालमत्ता विक्री व खरेदी संबंधी क्षेत्रात कार्यरत असल्‍याची त्‍याला माहिती होती. मे महिन्‍यात मेहुल चोक्‍सीने मला पार्टनरशिपमध्‍ये व्‍यवसायाची ऑफर दिली होती. अँटिग्वामध्‍ये बूटीक, हॉटेल आणि क्‍लब सुरु करण्‍याचा त्‍याचा विचार होता. या व्‍यवसायात मी त्‍याला मदत करावी, अशी त्‍याची अपेक्षा होती. यासाठी तो पैसे गुंतवणूक करणार होता, असा खुलासही बारबराने केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post