निफ्टीचा नवा उच्चांक ; भांडवली बाजाराची तेजीने सुरुवात मात्र पुन्हा पडझड



माय वेब टीम 

मुंबई - राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज सोमवारी १५९५१ अंकांचा नवा विक्रमी स्तर गाठला आहे. बाजारात सकाळपासून खरेदीचा ओघ सुरु आहे. यात निफ्टीने ९० अंकाची वाढ नोंदवली आहे. निफ्टीला १६००० अंकाचे शिखर खुणावत असून ते आजच सर होईल, असा अंदाज दरम्यान, मुंबई शेअर बाजारात देखील आज तेजी दिसून आली आहे. बाजार उघडताच पहिल्या तासात सेन्सेक्सने ३०० अंकांची झेप घेतली. सेन्सेक्स ५३२५० अंकांपर्यंत गेला होता. मात्र त्यानंतर झालेल्या नफावसुलीने सेन्सेक्सच्या तेजीला ब्रेक लागला. सध्या सेन्सेक्स १३० अंकांनी घसरला असून तो ५२७९४ अंकावर ट्रेड करत आहे. तर निफ्टीत २९ अंकांची किरकोळ घसरण झाली असून तो १५८३१ अंकावर आहे.

सेन्सेक्समधील ३० पैकी १८ शेअर तेजीत आहेत. ज्यात एशियन पेंट्स, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, नेस्ले, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, सन फार्मा, बजाज फायनान्स या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

आज आयटी आणि ऑटो शेअरवर दबाव दिसून आला आहे. इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी या शेअरमध्ये घसरण झाली आहे. निफ्टी १५९०० वर गेल्यास परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून नफावसुली होण्याची शक्यता जाणकांरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी सावध रहावे असा सल्ला दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post