अर्जुन कपूरसाठी खास ठरला वाढदिवस, मलायकाने दिल्या हटके शुभेच्छा

माय वेब टीम 

 मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा काल म्हणजेच २६ जून रोजी वाढदिवस होता. सोशल मीडियावर चाहत्यांनी अर्जुनला भरभरून शुभेच्छा दिल्यात. चाहत्यांसोबत अर्जुनच्या जवळच्या व्यक्तींनीही त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्जुनची गर्लफ्रेण्ड मलायका अरोराने अर्जुनसोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

तर अर्जुनचे काका असणारे अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मजेशीर पोस्ट शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल यांनी लिहिलं, 'वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! मी पुढची बरीच वर्ष तुझ्या ताटातून चोरून खाणार आहे. मला तुझा काका असल्याचा अभिमान आहे आणि मी तुझ्या दिर्घ आयुष्यासाठी, आनंदासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतो.'

अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूर हिनेदेखील अर्जुनला पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. सोनमने अर्जुनसोबतचा तिच्या लग्नातील फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'प्रिय अर्जुन, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला माहित असलेला दयाळू, निस्वार्थ आणि सर्वात जास्त काळजी घेणारा माणूस तू आहेस. मला तुझा अभिमान आहे.'

तर 'कि अँड का' चित्रपटात एकत्र काम केलेल्या करिना कपूरने देखील अर्जुनचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. अर्जुनची लहान बहीण अंशुला कपूरने देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अंशुलाने त्यांचा बालपणीचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'मला माहित असलेला चांगला माणूस. तू माझं घर आहेस. कायम माझ्या सोबत राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा.'

बहीण जान्हवी आणि खुशी कपूर यांनीही अर्जुनला शुभेच्छा देण्यासाठी इन्स्टाग्राम पोस्ट केल्या. खुशीने एका कार्यक्रमातील अर्जुन आणि तिचा हसणारा फोटो शेअर केला तर जान्हवीने एक लांब चिठ्ठी लिहिली, “हा तुझा वाढदिवस आहे! आणि तुझं वर्ष. एक मोठा असल्यावर किती मजा येते हे मला पटकन शिकवल्याबद्दल धन्यवाद. ज्ञाना दिल्याबद्दल नेहमीच धन्यवाद आणि रिअ‍ॅलिटी चेक, फूड पोस्ट्सबद्दल मी तुझी आभारी आहे. तुझ्यासाठी खूप खूप प्रेम.'

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post