अवघ्या काही सेकंदात भाजपचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले, प्रवीण दरेकरांसह कार्यकर्ते ताब्यात


माय वेब टीम 

 ठाणे -  स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण ( obc reservation) रद्द करण्यात आल्यामुळे भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे.  ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन (bjp obc chakka jam protest) करण्यात आले होते. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांना पोलिसांनी ताब्यात घेतली. (bjp protest against obc reservation)

मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. काही सेकंदच पोलिसांनी हे चक्का जाम आंदोलन होवू दिले. या नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

आज सकाळी ठीक 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली त्या आधी 9 वाजल्यापासून भाजपा कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमायला सुरुवात झाली होती. 10 च्या सुमारास प्रवीण दरेकर आले आणि त्यांनी चक्का जाम आंदोलनलाला सुरुवात केली आणि लगेच पोलिसांनी अवघ्या काही सेकंदात आंदोलकांना ताब्यात घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post