माय वेब टीम
नगर - करोनाच्या तिसर्या संभाव्य लाटेशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी त्यात्या जिल्ह्यातील परिस्थितीनूसार निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. नगर जिल्हा कारोना संसर्गाच्या तिसर्या लेवलमध्ये असून त्यानूसार या लेवलचे निर्बंध उद्यापासून (रविवार) जिल्ह्यात लागू होणार आहेत. यात शनिवारी आणि रविवारी मेडिकल (Medical) वगळात सर्व बंद राहणार असून अन्य दिवशी दुपारी चारपर्यंतच सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज सकाळी सर्व तहसीलदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेवून सुचना दिल्या आहेत. यात नगर जिल्हा कोविड निर्बंधांच्या लेवल-3 मध्ये असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरकारच्या सुचनेनूसार उद्यापासून निर्बंध लागू करण्यात येत आहेत. यात सर्व तालुक्यातील सर्व दुकाने/आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच दर शनिवारी/रविवारी फक्त मेडिकल स्टोअर्स सुरू राहतील (किराणा दुकाने सुद्धा बंद राहतील). याबाबतचे सविस्तर आदेश थोडच्या वेळात जिल्हाधिकारी काढणार असल्याचे समजतेे.
Post a Comment