रोनाल्डोच्या ‘त्या’ एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला मोठा फटका माय वेब टीम 

स्पोर्ट्स डेस्क - पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला चांगलाच फटका बसला आहे. युरो कप २०२२ स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोच्या या एका कृतीमुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास २९३ कोटींचं नुकसान झालं आहे.

यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘एफ’ गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं त्याने पाहिलं. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन पाणी प्या असं म्हटलं.

रोनाल्डोची ही एक कृती कोका कोला कंपनीला मोठी महागात पडली असून शेअर्स १.६ टक्क्यांनी खाली घसरले आणि तब्बल चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. कंपनीची किंमत २४२ बिलियन डॉलर्सवरुन २३८ वर आली आहे.

रोनाल्डोच्या चमकदार कामगिरीमुळे पोर्तुगालची हंगेरीवर ३-० ने मात

दरम्यान मैदानात पोर्तुगालने शेवटच्या दहा मिनिटात चमत्कारिक खेळ करत हंगेरीला ३-० ने पराभूत केले. सामन्याच्या ८०व्या मिनिटांपर्यंत शांत असलेला पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने विक्रमी २ गोल करत स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या ६० हजारांपेक्षाही जास्त प्रेक्षकांची मने जिंकली. इस्रायलविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात रोनाल्डोने आपला १०४वा गोल नोंदवला होता. त्यामुळे हंगेरीविरुद्धची कामगिरी पकडून रोनाल्डोच्या खात्यात आता १०६ आंतरराष्ट्रीय गोल जमा झाले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post