फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर आणि इतर सहा जणांची चौकशी

स्पोर्ट्स  डेस्क -  महान फुटबॉलपटू तसेच अर्जेटिनाच्या १९८६च्या फिफा विश्वचषक जेतेपदाचे शिल्पकार दिएगो मॅराडोना यांचे गेल्यावर्षी वयाच्या ६०व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले झाले होते. मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले. मात्र आता सात महिन्यांच्या कालावधीनंतर मॅराडोना यांच्या मृत्यूबाबत सरकारी वकीलांनी त्यांच्या वैद्यकीय व नर्सिंग टीमवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. 

माजी अर्जेटिना फुटबॉलरचे वैयक्तिक चिकित्सक लिओपोल्डो लुक, मानसोपचारतज्ज्ञ अगस्टीना कोसाचोव्ह आणि अनेक परिचारिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मॅराडोना यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 सोमवारीपासून अर्जेटिनाच्या वकिलांकडून या सात जणांची चौकशी केली जाणार आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या आरोग्याबद्दल माहिती असताना देखील, चुकीची उपचार पद्धती वापरण्यात आली आणि त्यामुळे दिएगो मॅराडोना यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असा आरोप सात जणांवर लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी ६० वर्षीय दिएगो मॅराडोना यांच्या मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराच्या झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले झाले होते. मॅराडोना यांच्या शस्त्रक्रियेनंतर बिघडलेल्या प्रकृतीसाठी त्यांच्या पाच मुलांपैकी दोन मुलांनी न्यूरोसर्जन लिओपोल्डो लुक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर हा तपास सुरु करण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post