म्हणून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चुरस : शिर्डी संस्थानावर कोणाची वर्णी?

  


माय वेब टीम 

अहमदनगर  - शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दीर्घकाळ रखडलेल्या नव्या संस्थानच्या नियुक्तीची चर्चा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांनीही संस्थानवर राजकीय व्यक्ती नको, अशी भूमिका घेत सामाजिक क्षेत्रातील नावे पुढे केली आहेत. त्यामुळे यावेळीही संस्थानवर वर्णी लागण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.


महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निवड होणे अपेक्षित असले तरी तिन्ही पक्षांत एकमत होत नसल्याने हे काम रखडल्याचे सांगण्यात येते. सत्ता वाटप सुत्रानुसार हे देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे सांगण्यात येते. 

त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत आता पारनेरचे आमदार, कोविड सेंटरच्या सेवा कार्यामुळे चर्चेत आलेले नीलेश लंके यांचेही नाव पुढे केले जाऊ लागले आहे. काँग्रेसकडूनही आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावे पुढे केली जात आहेत. तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदावर दावा सांगितला जात आहे.

संस्थानच्या विश्वस्त मंडळाची मुदत पूर्वीच संपली आहे. त्यामुळे सध्या न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तदर्थ समितीमार्फत कारभार सुरू आहे. संस्थानशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यातील एकाच्या सुनावणीच्यावेळी कोर्टाने नवीन विश्वस्त मंडळ नियुक्तीसंबंधी सरकारला निर्देश दिले आहेत. शिवाय यावर राजकीय व्यक्तींची वर्णी लावली जाऊ नये, असे निर्दशही आहेत आणि तशी मागणीही विविध संघटनांकडून होत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post