विजेत्या संघाला पावणेबारा कोटी; आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम जाहीर



माय नगर वेब टीम  

दुबई : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या संघाला म नाच्या गदेसह (मेस) ११ कोटी, ७१ लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या बक्षिसांची रक्कम काल आयसीसीने केली.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून १.६ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ११ कोटी ७१ लाख इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. उपविजेत्या संघाला आठ लाख अमेरिकन डॉलर म्हणजे ५ कोटी ८५ लाख रुपये दिले जातील. आयसीसीचे सीइओ जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची समान विभागणी केली जाईल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत एकमेकांना भिडणार आहे. १८ ते २३ जून या कालावधीत साउथम्पटन येथे ही लढत खेळवली जाणार आहे आणि दोन्ही संघ त्यासाठी सज्ज झाले आहेत. २३ जून हा राखीव दिवस असेल. हे दोन्ही निर्णय जून २०१८मध्ये आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याआधीच घेण्यात आले होते, असेही आयसीसीने म्हटले आहे. दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) लढत ड्रॉ झाली किंवा सामना ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post