अपुऱ्या आरोग्य सुविधांबाबत लाज कशी वाटत नाही; खा. नारायण राणे यांचा ठाकरे सरकारवर घणाघात


माय वेब टीम 

 सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखा निसर्गरम्य जिल्हा आज कोरोनाग्रस्त जिल्हा आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत. पण डॉक्टर नाहीत. बेड नाहीत. ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी नाही? पालकमंत्र्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, अशी परखड टीका माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केली.

कोलगांव ग्रामपंचायतीतर्फे तयार करण्यात आलेल्या पाटीदार समाज हॉलमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन भाजपचे ज्येेष्ठ नेते खा. नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक रुग्णांचे बळी जात आहेत, तर काहीजण अत्यवस्थ आहेत. याबाबत आपलं राज्याच्या आरोग्य सचिवांशी सकाळीच बोलणं झालं. त्यावेळी त्यांच्याशी मी विस्तृत चर्चा करून जिल्ह्यातील रुग्णालयांना फिजिशीयन, डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे. डॉक्टर व कर्मचारी उपस्थित झाले नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्याही सूचना मी दिल्या आहेत. जर आपण हे करू शकतो, तर जिल्ह्याचे पालकमंत्री सत्तेतील खासदार व आमदार काय करत आहेत, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post