'घाई गडबड करू नका.....


 माय वेब टीम 

मुंबई - देशात करोना संक्रमणाच्या दुसरी लाट ओसरताना दिसत असतानाच करोना विषाणूच्या 'डेल्टा प्लस व्हेरियंट'नं धुमाकूळ घातलेला दिसत आहे. करोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला करोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहे. करोना संसर्ग वेगाने वाढत असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या ७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज ते दूरचित्र प्रणालीद्वारे झाले बैठकीत बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील बैठकीला उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या लागतील याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले

तसेच, 'विशेषतः दुसऱ्या लाटेत आपण ऑक्सिजनच्या कमतरतेचा अनुभव घेतला आहे. आणि म्हणूनच सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजनचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. दुर्गम आणि ग्रामीण भागात औषधी व इतर आवश्यक वैद्यकीय सामुग्री उपलब्ध राहील हे पहा. आपल्याला बऱ्याच ठिकाणी फाईल्स रुग्णालयांसारख्या सुविधा उभारता येतील त्यासाठी इमारती व जागांचे नियोजन करून ठेवा' असे आदेशही त्यांनी दिले.

दरम्यान, जगभरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा वेगाने फैलाव सुरू आहे. जगात डेल्टा प्लस व्हेरियंटचे तब्बल २०५ रूग्ण झालेत. यापैकी ४० रूग्ण भारतात आहेत. तर राज्यात २१ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होऊ नये. तसेच डेल्टा प्लस व्हेरियंट तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ शकतो, हा धोका ओळखून राज्य सरकार निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचं समजते आहे. राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय २० दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. पण निर्बंध शिथिल केल्यापासून कोरोनाबाधितांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळल्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post