SBI बँकेचा ग्राहकांना अलर्ट, पॅनकार्ड अपडेट केले तरच 'ही' सेवा सुरू राहणार

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्लीः जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि डेबिट कार्ड वरून इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले की, डेबिट कार्डवरून जर तुम्हाला कोणत्याही अडचणीविना देवाण-घेवाण करायची असेल तर तुम्हाला बँकेत आपले पॅन कार्ड नंबर अपडेट करावे लागेल. 

ऑनलाइन-ऑफलाइन करू शकतात पॅन कार्ड अपडेट 

पॅन कार्ड नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीचे करता येऊ शकते. हे तुम्ही ऑनलाइन करू शकता. तसेच बँकेच्या शाखेत जाऊन सुद्धा तुम्हाला हे अपडेट करता येऊ शकते. गेल्या वर्षी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन नियमासंबंधी रिझर्व्ह बँकेने काही बदल केले आहेत.

SBI ने आपल्या ग्राहकांना केले अलर्ट 

एसबीआयने सोशल मीडिया साइट ट्विटरवर ही माहिती दिली आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांना इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन मध्ये काही अडचण येत आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. एसबीआय डेबिट कार्ड द्वारे कोणत्याही अडचणीविना विदेशी देवाण-घेवाण सुरू ठेवायची असेल तर बँकेत आपल्या रेकॉर्डनच्या पॅन कार्डची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे, असे बँकेने म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post