ऑनलाइन पेमेंटसाठी अवघ्या काही सेकंदात बनवा UPI पिन

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - भारतात युजर्स हळूहळू डिजिटल इंडियाकडे वळत आहेत. भाजीपाला खरेदी करायचा असेल किंवा कोणत्याही शॉपिंग मॉलमधून सामान खरेदी नंतर पेमेंट करायचे असेल तर डिजिटल माध्यम अनेकांची पसंत बनली आहे. गुगल पे पासून फोन पे पर्यंत असे अनेक यूपीआय आहेत. जे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा देतात. UPI अॅप्स द्वारे पेमेंट करण्यासाठी UPI पिन असणे खूप गरजेचे आहे. याच्याशिवाय तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकत नाहीत. जर तुम्ही आतापर्यंत UPI पिन बनवला नसेल तर ही सोपी पद्धत जाणून घ्या. यूपीआय पिन बनवण्यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे. विना डेबिट कार्ड पिन बनवला जाऊ शकत नाही.

UPI पिन म्हणजेच, यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस पर्सनल आयडेंटिफिकेशन होय. हा ४ किंवा ६ डिजिटचा पासकोड असतो. याला युजर्सकडून सेट केले जाते. हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. नाहीतर पेमेंट करु शकणार नाही. तसेच यूपीआय पिनला कोणासोबतही शेयर करू नये. कारण, याचा वापर ट्रान्झॅक्शनसाठी केला जातो. यूपीआय आधारित अॅप साठी वेगवेगळ्या आयडीची गरज नाही. एकाच यूपीआय पि सर्व अॅप्सवर ऑनलाइन पेमेंट्स करण्यास मदत करू शकतो. 

असा बनवा यूपीआय पिन 

>> सर्वात आधी तुम्हाला कोणत्याही यूपीआय आधारित अॅपवर जावे लागेल. अॅपला ओपन केल्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट सेक्शनमध्ये जावे लागेल. 

>> या ठिकाणी तुम्हाला सर्व बँक्सची लिस्ट दिसेल. यात तुम्ही तुमची बँक निवडा. 

>> यानंतर तुम्हाला सेट चा पर्याय दिसेल. यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला आपल्या डेबिट कार्डची शेवटची नंबर एंटर करावी लागेल. तसेच एक्सपायरी डेट एन्टर करावी लागेल. 

>> यानंतर तुमच्या फोनवर बँकेकडून एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी एन्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचा यूपीआय पिन टाकता करता येईल. 

>> आपल्या पसंतीचा यूपीआय पिन बनवल्यानंतर तुम्ही त्याला सबमिट वर टॅक करावे लागेल. आणि तुमचा यूपीआय पिन बनवला जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post