भूकंपाच्या हादऱ्यांनी हादरली राजधानी; दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले हादरे



माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली -  राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा भूकंप झाला असून दिल्ली-एनसीआरपर्यंत त्याचे हादरे जाणवले आहेत. रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी झालेल्या हा मध्यम स्वरुपाचा हा भूकंप ४.२ रिश्टर स्केल इतका होता. अलवार हे भूकंपाचे मुख्य केंद्र होते अशी माहिती राष्ट्रीय भूकंप केंद्राकडून देण्यात आली आहे.
दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोकं आपल्या घरातून बाहेर पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केल ४.२ तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र हरियाणाच्या गुरुग्रामपासून ४८ किमी दूर होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेकांनी ट्विट केलं होतं. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाजियाबाद या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं ट्विटर युजर्सनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post