कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल? वाचा...

 


माय अहमदनगर वेब टीम

बुधवार, ०९ डिसेंबर २०२०. चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीत विराजमान असेल. काही राशीच्या व्यक्तींच्या योजना मार्गी लागतील. मान, सन्मान वाढतील. तसेच काही राशीच्या व्यक्तींनी भावनात्मक निर्णय टाळावेत. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : बुधवार, ०९ डिसेंबर २०२० 

मेष : कौटुंबिक कुरबुरी बाजूला ठेवा. जोडीदाराशी दिलखुलास चर्चा करा. आजचा दिवस परोपकारात व्यतीत होऊ शकेल. कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडू शकतील. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. पत्नीच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. काही समस्या संभवतात. 

वृषभ : आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन करा. लोकांच्या मनातील गैरसमज बाजूला सारा. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. दुपारनंतर शुभवार्ता मिळू शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सायंकाळी पाहुण्यांच्या आगमनामुळे मन प्रसन्न राहील. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल. 

मिथुन : बोलण्यात स्पष्टपणा ठेवा. आपल्या विचारांवर आपले वर्चस्व ठेवा. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभेल. पालकांचे शुभाशिर्वाद लाभतील. एखादी मौल्यवान वस्तू प्राप्त होऊ शकेल. दिनक्रम काहीसा व्यस्त राहू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगावी. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. 

कर्क : आपल्या बोलण्याने लोकांमध्ये उत्साह वाढेल. नोकरीच्या संधींकडे लक्ष ठेवा. राशीस्वामिचा गुरुशी जुळून येत असलेला समसप्तम योगामुळे मान, सन्मान वृद्धिंगत होऊ शकतात. धनलाभाच्या संधी उपलब्ध होतील. कोषवृद्धी होऊ शकेल. मात्र, भावनात्मक निर्णय घेऊ नयेत. अन्यथा भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकेल. 

सिंह : गुंतवणुकीसाठी घाई करू नका. प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस. मुलांच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास जाऊ शकतील. अपचन किंवा डोळ्याचे विकार त्रस्त करू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे. 

कन्या : लोकांना समाधानकारक उत्तरे द्याल. उत्तम लिखाण-वाचन होईल. हाती घेतलेली कामे तत्परतेने करणे लाभदायक ठरू शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. रचनात्मक कार्यातील आवड वाढीस लागेल. प्रतिकूल परिस्थिती रागावर नियंत्रण ठेवावे. धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळावी. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक धनलाभ होऊ शकेल. 

तुळ : घरातील कामात स्वतःला रमवून घ्या. स्पष्ट बोलण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभदायक दिवस. मिळकतीचे नवे स्रोत सापडतील. मान, सन्मान प्राप्त होतील. धावपळ करावी लागेल. मात्र, त्याचा परिणाम आरोग्यावर होणार नाही, याची काळजी घ्यावी. जोडीदाराचे उत्तम सहकार्य व सानिध्य लाभेल. 

वृश्चिक : खेळ अथवा स्पर्धा परीक्षेत यश मिळवाल. प्रवास घडतील. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. धनलाभ, मान, सन्मान, यश, कीर्ती वृद्धिंगत होऊ शकेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग. प्रतिकूल परिस्थिती बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. फिरायला जायची संधी मिळू शकेल. 

धनु : कौटुंबिक गोष्टीत समाधान मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध आनंदात जाईल. गृहपयोगी वस्तूंवर खर्च होईल. भौतिक सुख वृद्धिंगत होऊ शकेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यामुळे समस्या उद्भवू शकतात. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नये. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून कार्यरत राहावे. 

मकर : आपल्या विचारांवर ठाम राहा. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रातील वातावरण अनुकूल असेल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय परिवर्तनाच्या योजनेवर भर द्याल. जबाबदाऱ्या पार पाडाल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वाहन चालवताना योग्य काळजी घ्यावी. 

कुंभ : बाहेरच्या कामांमध्ये पूर्ण खात्री करून व्यवहार करा. छोट्या वाटणाऱ्या शाररिक समस्या सोडून देऊ नका. अचानक धावपळ करावी लागू शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. संपत्तीचे व्यवहार करताना वैधानिक पैलू तपासून घेणे हिताचे ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती नियंत्रणात येऊ शकेल. सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. 

मीन : गोड बोलून समोरच्या कडून कामे करून घ्या. सरकारी कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. प्रवास घडू शकतील. व्यवसायिक प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी महत्त्वाची माहिती हाती लागू शकेल. मानसिक शांतता लाभेल. पालकांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतील.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post