ऊर्मिला मातोंडकरचा आज शिवसेना प्रवेश

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवबंधन बांधणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली असून मंगळवारी चार वाजता ऊर्मिला  शिवसेना प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. ऊर्मिला ही मुळात शिवसैनिकच आहे. मंगळवारी तिच्या पक्षात प्रवेश करण्याने शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असेही राऊत म्हणाले.  तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी  ऊर्मिलाच्या  पक्ष प्रवेशावर बोलताना विधान परिषदेसाठी राज्यपाल कोट्यातून नियुक्त सदस्या साठी शिवसेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्याकडे ऊर्मिलाच्या  नावाची शिफारस केली आहे.  त्यामुळे ऊर्मिलाचा शिवसेना प्रवेश निश्चित आहे, असे सांगितले.


ऊर्मिला मातोंडकर यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर मुंबई येथून निवडणूक लढवली होती, त्यावेळी भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी त्यांना पराभूत केले होते. त्यानंतर ऊर्मिलाने सप्टेंबर महिन्यात काँग्रेसमधील गटबाजीवरून काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही ऊर्मिला समाज माध्यमांवर सक्रिय होती. अभिनेत्री  कंगना राणावत वादात तिने महाविकास आघाडीचे खुलेपणाने समर्थन केले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post