स्वस्तात जमीन देण्याचे आमिष; दोघे जेरबंद



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जितेंद्र भारत उर्फ दूधकल्या भोसले ( वय 31, रा. घोसपुरी ता. नगर व रा. पढेगाव ता. कोपरगाव), राहुल टवक-या भोसले (वय 27, रा. पिंपळगाव पिसा, ता. श्रीगोंदा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की मित्र व मला अहमदनगर जिल्ह्यात स्वस्तात जमीन देतो, असे फोनवर सांगून चिखली येथे बोलावून घेतले. फसवणूक करून सहा ते सात जणांनी दगडफेक व मारहाण केली. या दरम्यान, आरोपींनी जवळील रोख रक्कम व सोन्याची चैन असा एकूण 1 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला, अशी फिर्याद अजिंक्य चंद्रकांत गोगावले (रा. हवेली, जि. पुणे) यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या दाखल गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र भोसले हा घोसपुरी परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार श्री कटके यांनी त्यांच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने घोसपुरी शिवारात सापळा लावला, दरम्यान जितेंद्र भोसले व राहुल भोसले या दोघा आरोपींना पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असतात गुन्हा हा साथीदार करण भारत उर्फ दूधकल्या भोसले ( रा. पढेगाव ता. कोपरगाव), अनिल टवक-या भोसले (रा. पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा) व देवेंद्र भारत उर्फ दूधकल्या भोसले (रा. पडेगाव ता. कोपरगाव) अश्यांनी मिळून केल्याची कबुली दिली. या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पकडण्यात आलेल्या दोघेही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो. नि. अनिल खटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकॉ दत्ता हिंगडे, बबन मखरे, पोना सुनील चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, पोकाॅ प्रकाश वाघ, रोहिदास नवगिरे, जालिंदर माने, प्रशांत राठोड, चापोहेकाँ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post