'या' गुन्ह्यामुळे डॉ.निलेश शेळके पोलिस कोठडीतमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सुमारे दोन अडीच वर्षांपासून फरार असलेला आरोपी डॉ.निलेश शेळके याला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आर्थिक गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असताना त्याची 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान निलेश शेळकेतर्फे ऍड. संजय दुशिंग, ऍड.महेश तवले, ऍड.संजय वालेकर यांनी काम पहिलं.

नगरमधील रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य संशयित बाळ बोठे याचा शोध घेत असताना पोलिसांनी पुण्यातून डॉ.निलेश शेळके याला ताब्यात घेतले होते. बोठे पसार होण्यात शेळके याची काही मदत झाली का, या अनुशंगाने त्याच्याकडे चौकशी केली गेल्याचे समजते. दरम्यान शेळके याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो तब्बल दोन अडीच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो हाती येताच त्याला कोतवाली पोलिसांत दाखल गुन्ह्याप्रकरणी रितसर अटक करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post