भाजपाला पाकिस्तानपेक्षा शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो - महसूल मंत्री बाळासाहेब थोरातमाय अहमदनगर वेब टीम 

मुंबई - भाजपाला शेतकऱ्यांची जिरवायची आहे त्यामुळे परदेशातून शेती माल आयात करण्यात येतो आहे. पाकिस्तानपेक्षा भजपाला शेतकरी हा मोठा शत्रू वाटतो अशी घणाघाती टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी काय्दायविरोधात पंजाब आणि हरयाणा राज्य पेटून उठलं आहे. तिथे आजही आंदोलनं सुरु आहेत. अद्याप राज्यातील शेतकऱ्यांना या कायद्यांचा चिमटा बसला नाही. मात्र धोका कायम आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सांगलीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनात ते बोलत होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post