आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी?


माय अहमदनगर वेब टीम

शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २०२०. चंद्र बुधाचे स्वामीत्व असलेल्या मिथुन राशीत विराजमान असेल. चंद्र आणि बुधच्या शुभ योगाचा कर्क राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : शुक्रवार, ०६ नोव्हेंबर २०२०

मेष : खर्चाचा ताळमेळ आधीच बांधून ठेवा. हवे असलेले उत्तर मिळेल. नवीन करार पूर्णत्वास जाऊ शकेल. मान, सन्मान प्राप्त होतील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कीर्ती वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. 

वृषभ : नवीन नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावणे येईल. आपला विचार स्पष्ट मांडा. नवीन प्रकल्पातून लाभ मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मन प्रसन्न राहील. कायदेशीर प्रकरणांत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. कार्यालयातील वातावरण अनुकूल असेल. 

मिथुन : आपले कार्य सिद्धीस जाईल. कलेमध्ये प्राविण्य मिळवाल. रचनात्मक कार्यांत दिवस व्यतीत होईल. यातून लाभ मिळतील. आवडते छंद जोपासाल. आवडीचे काम मिळाल्याने उत्साहात कार्यरत राहाल. नवीन योजनांवर लक्ष केंद्रीत कराल. सहकारी वर्गाची मदत मोलाची ठरू शकेल. 

कर्क : लोकांचा आपल्याबाबत गैरसमज होऊ देऊ नका. प्रतिस्पर्ध्याचे डावपेच ओळखा. आजचा दिवस उपयुक्त ठरू शकेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. कुटुंबातील सदस्यांची मदत मोलाची ठरेल. मनापासून आणि प्रामाणिकपणे केलेले काम यशकारक ठरेल. कार्यालयात आपले मत विचारात घेतले जाऊ शकेल. 

सिंह : अपेक्षित उत्तर मिळेल. नोकरीमध्ये वर्चस्व राहील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल. वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. जोडीदाराचे सानिध्य आणि सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असेल. 

कन्या : व्यवसायात नवीन घडामोडी घडतील. घरामध्ये शांततेचे वातावरण राहील. वर्तणूक आणि व्यवहार सावधगिरी बाळगून करावेत. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मंगल कार्याच्या आयोजनाबाबत कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा शक्य. आत्मविश्वास वाढेल. दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल असेल. 

तुळ : दिवसभरात छोटे प्रवास घडतील. धार्मिक गोष्टींचे वाचन होईल. विशेष लाभदायक दिवस ठरू शकेल. कार्यक्षेत्रातील मतभेद वा वाद संपुष्टात येऊ शकतील. नवीन प्रकल्पावर काम सुरू करण्यास अनुकूल काळ. दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरू शकेल. 

वृश्चिक : अचानक धनलाभ घडेल. दूरवरचे नातेवाईक संपर्कात येतील. दिवसभरात काही ना काही लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यापारी वर्गाने नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून अमलात आणणे फायद्याचे ठरेल. कौटुंबिक वातावरण सुखमय, शांत आणि आनंदी राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. 

धनु : जोडीदाराबरोबर उत्तम संवाद घडेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस सामान्यपणे व्यतीत होईल. सावधगिरीने व्यवहार करावे. गुंतवणूक करताना ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. संधीचे सोने करणे आपल्या हातात राहील. 

मकर : प्रकृतीबाबत कुठेही तडजोड करू नका. नोकरी, व्यवसायात उत्तम लाभ होईल. भागीदारीतील व्यवहार लाभदायक ठरतील. कुटुंबातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. मुलांसदर्भात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. दिवसाचा उत्तरार्ध काहीसा व्यस्त राहू शकेल.

कुंभ : नेहमीच्या खर्चात भर पडेल. ठरवलेल्या विचारांना कलाटणी मिळेल. आजचा दिवस हितकारक असेल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. घाईने निर्णय घेऊ नये. कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. 

मीन : घरातील मोठांचे आशीर्वाद घ्या. सामाजिक प्रतिष्ठा सांभाळा. आजचा दिवस लाभदायक ठरेल. भाग्याचा उत्तम पाठिंबा मिळेल. मित्रांचे सहकार्य आणि मदत मोलाची ठरू शकेल. व्यापारी वर्गाने जोखम पत्करून केलेली कामे फायदेशीर ठरतील. प्रतिकूल परिस्थिती धैर्य, संयमाने हाताळणे हिताचे ठरेल. बुद्धिकौशल्याचा वापर केल्यास कामे सुलभतेने पार पडू शकतील.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post