महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला तोंड दाबून बुक्यांचा मार - माजी मंत्री कर्डिले



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : या पक्षाच्या तिघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे काही चालत नाही. त्यांना कुठलाही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. खुद्द मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात जनतेला सांगितले आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार फुटतील या भीतीने ते सत्तेमध्ये आहेत. काँग्रेस पक्षाची व्यथा खूप वाईट असून काँग्रेसला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मदत करण्याचे काम केले. शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये दिले. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून हातावर काम करणार्‍यांना मोफत गहू व तांदूळ देण्याचे काम केले. दुष्काळामध्ये शेतकर्‍यांचे 1 लाख पशुधन वाचविण्यासाठी छावण्या सुरु केल्या. नगर तालुका दुष्काळी व जिराईत तालुका आहे. या तालुक्याचा कायमचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन घोसपुरी व बुर्‍हाणनगर पाणी योजना मार्गी लावून सुमारे 80 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावला. संकटाच्या काळामध्ये नेहमीच नगरपालिकेला न्याय देण्याचे काम केले. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची रब्बी व खरिपाची पिके वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडाला आहे. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले. टाकळी काझी परिसरातील शेतकर्‍यांना सुमारे 9 कोटी रुपयांची मदत मिळवून देण्याचे काम केले. असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.

टाकळी काझी (नगर तालुका) येथे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना खेळते भांडवलाचे चेक वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. समवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत म्हस्के, भीमराज लांडगे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, हरिभाऊ कर्डिले, संभाजी पवार, छत्रपती बोरुडे, अनिल ठोंबरे, बन्सी कराळे, उद्धव कांबळे, तुकाराम वाघुले, शाम घोलप, बाजारीव हजारे, मनोज कोकाटे, प्रशांत गहिले, राजेंद्र कोकाटे, महेश पाटील, पोपट शेळके, भाऊसाहेब काळे, राजेंद्र आरोळे, संतोष ढगे, अनिल शेडाळे, विजय काळे, बाबा काळे, रमेश गव्हाणे, कचरू ढगे, काशिनाथ गावडे, गंगाधर काळे, अ‍ॅड. अर्जुन पवार, बाबाजी शेख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना संपत म्हस्के म्हणाले की, अडचणीच्या काळामध्ये शिवाजी कर्डिले शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकर्‍यांना भरीव मदत केली. त्यांच्या समवेत जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्यासारख्या सर्वसामान्याला बँकेचे उपाध्यक्षपद मिळाले, त्यात कर्डिले यांचे मोलाचेै सहकार्य राहिले. आम्ही नाबार्डच्या माध्यमातून गाई म्हशीसाठी शेतकर्‍यांना 100 कोटी रुपयांचे कर्ज दिले. आज कोरोनाच्या काळात शेतकरी संकटात आला आहे. अशावेळी कर्डिले शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आले. नगर तालुक्याला कर्डिले यांनी कायम सांभाळले. 25 वर्षे ते आमदार होते. यावेळी राहुरीत त्यांचा पराभव झाला. त्याला तालुक्यातून झालेले कमी मतदानही कारणीभूत आहे. मी दुसर्‍या पक्षात असूनही त्यांनी मला लहान भावासारखे सांभाळून घेतले. जिल्ह्यातील कारखानादाराला वाटते कर्डिले वरचड होऊ नये, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. नगर तालुक्याच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. कर्डिले आज आमदार नाहीत हे प्रत्येकाच्या मनात असलेली खंत आहे. यावेळी त्यांनी कर्डिले यांच्या स्तुती सुमने उधळून त्यांचे कौतूक केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी पवार यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post