किरण काळे बहुआयामी व्यक्तिमत्त्व - आमदार लहू कानडेसत्यजित तांबे यांनी काळे यांची थोपटली पाठ

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अल्पावधीतच नगर शहरातील काँग्रेसला संजीवनी मिळवून दिली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहत्यिक, काँग्रेसचे आ. लहू कानडे यांनी काढले आहेत.

आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काळे यांचे वाढदिसानिमित्त अभिष्टचिंतन केले. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे पदाधिकारी मुबिनभाई शेख यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचे यासाठी आयोजन करण्यात आले होते.

महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी महापौर दीप चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नगर शहर,जिल्हा,राज्यातील ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांनी काळे यांचे फोनद्वारे, समक्ष भेटून, तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभीष्टचिंतन केले.  

 

यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, डॉ.शकीलफातेमा शेख, प्रा डॉ.रफियाफातेमा शेख, काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, नगर शहर मागासवर्गीय सेलचे शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्हाट, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संपतराव म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, मूबीनभाई शेख, अन्वरभाई सय्यद, ज्येष्ठ नेते विजुभाऊ परदेशी, विशाल कळमकर, प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबुज,  जिल्हा सरचिटणीस ॲड. माणिकराव मोरे, अशोक कानडे, जिल्हा सचिव मनसुख संचेती, मागासवर्गीय जिल्हा सचिव शिवाजीराव जगताप, अनिसभाई चुडीवाल, बंटी यादव, गणेश अाप्रे, ॲड. चेतन रोहोकले, अक्षय कुलट, संदीप पुंड, चंद्रकांत उजागरे, मनोज चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.  


तांबे यांनी थोपटली काळे यांची पाठ

महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ.सुधीर तांबे, आ. लहू कानडे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून काळे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त केला होता. आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे शुभेच्छा देत त्यांची पाठ थोपटली आहे. तांबे यांनी म्हटले आहे की, काळे हे नगर शहर काँग्रेसचे कार्यक्षम अध्यक्ष, उत्तम संघटक, कल्पक व्यक्तिमत्व आहेत. काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील काँग्रेस एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post