‘बरं झालं तुझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही’; त्या व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे होतेय ट्रोल

 


माय अहमदनगर वेब टीम

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणारे ट्विट्स, इन्स्टाग्राम पोस्ट, व्हिडीओ, फोटोज यामुळे ती कायम चर्चेत असते. अलिकडेच तिने असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “नशीब तुझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही”, असं म्हणत तिला काही जाणांनी ट्रोल देखील केलं आहे.


अंकिताने इन्स्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर तिने मला सकारात्मक वाटतंय अशा आशयाची कॉमेंट देखील लिहिली होती. मात्र हा व्हिडीओ काही नेटकऱ्यांना आवडला नाही. परिणामी त्यांनी अंकितावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. “सुशांतला न्याय मिळणार नाही म्हणून तू आनंदी दिसते आहेस. सुशांत गेल्यापासून तू खूप आंनदी झालेली दिसते आहेस. बरं झालं तूझं हे रुप सुशांतनं पाहिलं नाही.” अशा आशयाच्या कॉमेंट्स लिहून काही टीकाकारांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.


अंकितावर का संतापले नेटकरी?

अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या मृत्यूसाठी तिने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जबाबदार धरलं होतं. सोशल मीडियाद्वारे ती वारंवार रियाच्या जीवनशैलीवर टीका करत होती. परंतु आता ती देखील सोशल मीडियावर आनंदी असतानाचे व्हिडीओ शेअर करत आहे. या पार्श्वभूमीवर तिचे हे व्हिडीओ शेअर करणं काही नेटकऱ्यांना आवडलेलं नाही. परिणामी तिच्यावर आता टीका केली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post