या नऊ राशीना आज दिवस आहे, फायद्याचा ; जाणुन घ्या
माय अहमदनगर वेब टीम
शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०. चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. गुरु आणि शनी दोन्ही ग्रह एकाच उत्तराषाढा नक्षत्रावर स्थित असतील. एकूणच ग्रहस्थिती तुळ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ आणि लाभप्रद असेल. तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळतील? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०

मेष : आपली पुण्याई कामाला येईल. भागीदारी व्यवसायात प्रगती दिसेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल असेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. रचनात्मक कार्य करण्याची संधी मिळले. करिअरमध्ये प्रगतीचे योग प्रबळ होऊ शकतील. अति तिखट बोलणे टाळा. हितशुत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवणे हिताचे ठरेल.

वृषभ : उगाच कोणावर भरोवसा ठेवू नका. बोलण्यात स्पष्टता ठेवा. आपल्या दूरदृष्टीचा प्रभाव कामकाजावर दिसून येईल. याचा फायदा भविष्यात मिळेल. अनुभवी लोकांचा सल्ला मोलाचा ठरेल. नवीन संधी प्राप्त होतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना काहीतरी नवे शिकण्याची संधी मिळेल. जोडीदाराला आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहील.

मिथुन : आपले कार्य आपल्याच पराक्रमावर पुढे न्या. लोकांना बोलायला संधी देऊ नका. कार्यक्षेत्रातील वातावरण सुधारल्याचा लाभ मिळेल. मानसिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीसाठी अनुकूल कालावधी. मुलांची प्रगती पाहून मन आनंदी होईल. कोणत्याही संक्रमाणापासून सावध राहा. प्रकृती जपा. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.


कर्क : नवीन संधी आपल्यासमोर येतील. योग्य गोष्टीची निवड करा. करिअरसंदर्भात विचार करताना चांगल्या-वाईट दोन्ही बाजू तपासून घ्याव्यात. व्यवसायिक प्रवास संभवतात. कौटुंबिक वातावरण शांततामय आणि सकारात्मक राहील. मित्रांची मदत मोलाची ठरेल. जोडीदाराचे सानिध्य आणि सहकार्य प्राप्त होईल. मन प्रसन्न राहील.

सिंह : अति घाईने कोणते निर्णय घेऊ नका. शारीरिक स्वास्थ्य सांभाळा. गुंतवणुकीत जोखीम पत्करण्यास अनुकूल कालावधी. भविष्यात लाभ मिळतील. जमिनीचा व्यवहार पुढे सरकेल. भावंडांचा सल्ला अगदी मोलाचा ठरून व्यवसाय वृद्धी साध्य होऊ शकेल. कुटुंबासोबत उत्तम वेळ व्यतीत करू शकाल. व्यापारातील कौशल्य आर्थिक प्रगतीचे मार्ग प्रशस्त करेल. विद्यार्थ्यांनी आज मेहनत घेतल्यास उद्या सकारात्मक परिणाम दिसून येतील.

कन्या : गुंतवणूक करताना तज्ज्ञांचे सल्ले घ्या. कोणाच्या बोलण्यात फसू नका. दैनंदिक कामात बदल करणे हिताचे ठरेल. पर्यटनाच्या योजना आखाल. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाकडून कौतुक होईल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी अनुकूल कालावधी. वडिलांचे सहकार्य व मार्गदर्शन मोलाचे ठरेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा. कौटुंबिक संपत्तीत वृद्धी होईल.

तुळ : खंबीरतेने स्वतःला समजावा. आपल्या कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक वातावरण अनुकूल आणि सकारात्मक राहील. समस्यांचे निराकरण होऊ शकेल. मुलांच्या विवाहासाठी उत्तम स्थळे येतील. व्यवसायात वृद्धी होऊन यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. नवीन कार्यारंभासाठी अनुकूल कालावधी. विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. मानसिक तणाव कमी होईल.

वृश्चिक : मानसिक समाधान मिळेल. अडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. आपण घेतलेले निर्णय सार्थकी लागतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल. दान-धर्म, परोपकार शुभ फलदायी सिद्ध होऊ शकतील. प्रवासात सावधगिरी बाळगावी. परदेशात राहणाऱ्या आप्तेष्टांकडून शुभवार्ता मिळतील. पालकांचे शुभाशिर्वाद प्राप्त होतील. राजकीय सेवा क्षेत्रातील व्यक्तींच्या जबाबदाऱ्या वाढतील.

धनु : आपल्या बोलण्यातून विचार स्पष्ट मांडा. जवळपासचे प्रवास ठरतील. गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक वार्ता मिळतील. महत्त्वाचे निर्णय घेताना जोडीदाराचे मत अवश्य विचारात घ्यावे. नातेसंबंध दृढ होतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर : नातेवाईक-मित्र यांच्यामध्ये दिवस मजेत जाईल. आपला व्यवहार विश्वासपात्र ठेवा. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. सकारात्मक राहावे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. मित्रांशी झालेले मतभेद मिटू शकतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. मेहनतीला पर्याय नाही, हे विद्यार्थी वर्गाने कायम स्मरणात ठेवावे. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल.

कुंभ : समाजात लोक मान देतील. जुन्या ओळखीतून फायदा होईल. न्यायालयीन कामकाजात सकारात्मकता येईल. व्यावसायिक भागीदारीत सुधारणा घडून येऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक स्थ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post