कोरोना ; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - करोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे करोनावरील लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे करोना रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हे नियम १ ते ३१ डिसेंबपर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरु राहणार असल्याचं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.करोना संकट आतापर्यंत मिळवलेलं यश वाया जाऊ नये याकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने लक्ष दिलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणारी रुग्णवाढ लक्षात घेता योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केलं आहे.कंटेनमेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच स्थानिक प्रशासन, पोलिसांवर नियमांची योग्य अमलबजावणी करण्याची जबाबदारी असणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारांनी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी सूचना गृहमंत्रालयाकडून करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post