'या' कारणांमुळे लग्नात तुफान राडामाय अहमदनगर वेब टीम

नागपूर : लग्नसमारंभात जेवणाच्या टेबलावर बसण्याच्या वादातून तिघांनी युवकावर चाकूने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास कडबी चौकातील मंगल मंडप सभागृह परिसरात घडली.मोहम्मद आरिफ सय्यद (वय २५, रा. मोमिनपुरा) असे जखमीचे नाव आहे. आरिफचा मित्र अफजल शेख गौस शेख (वय १९, रा. मोमिनपुरा) याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी रज्जाक शेख, शाहीद व त्याच्या साथीदाराविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.मोमिनपुऱ्यातील एका युवकाचे मंगल मंडप येथे लग्न होते. अफजल, आरिफ व त्याचे साथीदार लग्नसमारंभाला गेले. रात्री १० वाजताच्या सुमारास आरिफ व अफजल टेबलावर बसून जेवण करीत होते. रज्जाक, शाहीद व त्याचा साथीदार असे तिघे आले. त्यांनी अफजलला टेबलावरून उठायला लावले. अफजलने नकार दिला. तिघांनी त्याला ठार मारण्याची धमकी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post