करोना काळात बाजार आधारीत भांडवलशाही अपयशी: पोप फ्रान्सिस

 माय अहमदनगर वेब टीम

रोम: करोना विषाणू महासाथीच्या काळात बाजार भांडवलशाही पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे पोप फ्रान्सिस यांनी म्हटले आहे. जगासाठी आता नव्या राजकारणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. हे नवीन राजकारण संवाद आणि एकता यावर भर देणारे आणि युद्धाला नाकारणारे हवे असेही त्यांनी सांगितले. 


कोविडनंतरच्या जगाबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त करताना त्यांनी आपला दृष्टीकोण मांडला आहे. यामध्ये त्यांनी सामाजिक शिक्षणाच्या मूलभूत घटकांचा, तत्वांचा समावेश केला आहे. त्यांनी आपल्या या संदेशाला 'फ्रेटेली टुट्टी' (Fratelli Tutti) म्हणजे सर्व भाऊ असे शीषर्क दिले आहे. या शीषर्कावरून वाद निर्माण झाला आहे. हे शीर्षक लैंगिक समानतेच्या मुल्याला नाकारत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. तर, व्हॅटिकन सिटीने हे आक्षेप फेटाळून लावले आहे. हा शब्द लैंगिक समानतेचा समावेश करणारा असून पोप यांच्या विचारपत्रात महिलांच्या मुद्यांचाही समावेश करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post