आता येणार ‘बधाई दो’; आयुषमानऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. हटके कथा, आयुषमानचा अभिनय एकंदरीत या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या चित्रपटात अभिनेता आयुषमान खुराना ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याने सीक्वेलची घोषणा केली आहे. या सीक्वेलचे नाव ‘बधाई दो’ असे आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरु करण्यात येणार आहे.


नुकताच राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भूमिसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, ‘आता तारीख ठरली. २०२१ची सुरुवात शुभेच्छा देत’ असे त्याने म्हटले आहे. तसेच पुढे त्याने हॅशटॅग वापरुन ‘बधाई दो’ असे म्हटले आहे.

‘बधाई दो’ या चित्रपटात राजकुमार राव एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भूमि पीटी शिकवणाऱ्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी यापूर्वी २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या हंटर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता बधाई दो या चित्रपटासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे दिसत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post