सरकारला जाग आणण्यासाठी मंदिराची दारे उघडून घटस्थापना करणार : वसंत लोढा

 



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर  - राज्यातील मंदिरे उघडण्या यावी या मागणी साठी भारतीय जनता पार्टी आग्रही भूमिका घेत आहे. अनेकदा आंदोलने केली मात्र राज्य सरकारने मंदिरांची दारे उघडण्याचा अद्याप निर्णय घेलेला नाहीये. २८ ऑगस्ट रोजी केलेल्या घंटानाद आंदोलनावेळी नवरात्र उत्सवा पर्यंत मंदिरे उघडण्यास परवांगी दिली नाहीतर आम्ही मंदिरे उघडू असा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी दि.१७ रोजी घटस्थापनेच्या दिवशी गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधिवत घटस्थापना करणार आहोत. आता भाविकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भूमिकेचा निषेध करत आम्ही मंदिरात घटस्थापना करणार आहोत. आम्ही आता शांत बसणार नाही, घेऊन झोपलेल्या तीन पायाच्या लंगड्या सरकारला जाग आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहे. याचा जो परिणाम होईल त्यास सरकार जवाबदार राहील, असा इशारा गौरीशंकर मित्रमंडळाने वसंत लोढा यांनी दिला.
*राज्यातील व शहरातील मंदिरे अद्याप बंद असल्याने शनिवारी होणारी घटस्थापना उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गौरीशंकर मित्रमंडळाने घेतला आहे. मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांनी  याबात पत्रक काढून राज्य सरकारला इशारा दिला आहे.*
           लोढा पुढे म्हणाले, केंद्र सरकारने देशातील मंदिरे उघडण्याची यापूर्वीच परवांगी दिली आहे. त्यानुसार देशातील सर्व प्रमुख मंदिरे उघडली असून त्याठिकाणाहून करोनाचा संसर्ग न वाढण्यास सर्व काळजी घेली जात आहे. मात्र महाराष्ट्रातच मंदिरे बंद ठेवून केद्र सरकारच्या आदेशास मुठमाती दिली आहे. मंदिरांचे दारे उघडण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यातच हिंदुनांच आंदोलने करावी लागत आहेत. शिवसेनेला स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या हिदुतवादी विचारांचा विसर पडला आहे. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांचे हिदुत्व आता बेगडी झालेले आहे. त्यामुळेच त्यांना असे अविचार सुचत आहेत. सर्व काही सुरु करत आहेत मग मंदिरेच का बंद ? काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नादी लागलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. मंदिरांचे दारे उघडण्यासाठी आम्ही सर्व भाविकांबरोबर आहोत.
          हिंदू धर्माचे शक्ती स्थान असलेले मंदिरे अजून का बंद ?  सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आता जागृत झालो आहोत. सर्व हिंदू भाविकांनीही आता जागृत व्हावे. भाविकांनी करोना पासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून या घटस्थपना सोहळ्यात सहभागी व्हवे. असे आवाहन विश्वहिंदू परिषदेचे मठमंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे व मंदिर सुरक्षा समितीचे बापू ठाणगे यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post