सीएम उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर ; जाणून घ्या असा असेल दौरा

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - गेल्या आठवड्यात झालेल्या भयावह जलकहरानंतर झालेल्या अभूतपूर्व नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून (ता.१९) दोन दिवस दौऱ्यावर आहेत. ते आपल्या दौऱ्याची सुरुवात सर्वांधिक नुकसानग्रस्त झालेल्या सोलापूरपासून करणार आहेत. प्रलयकारी पावसाने शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सोशल मीडियातूनही रान उठवले जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी यापूर्वीच दौऱ्यावर आहेत.  राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा करत आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

सकाळी 09:00 वाजता सोलापूर विमानतळावर आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण

सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा 

सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी

सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण

सकाळी 11:30 वा.  अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी

सकाळी 11:45वा.  अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण

दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण

दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी

दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण

दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post