'हा' नवा चित्रपट पाहण्यासाठी आमिर उतावळामाय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट आमिर खान प्रचंड खुश झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता मी आणखी वाट पाहू शकत नाही असं म्हणत त्याने अक्षयवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.नेमकं काय म्हणाला आमिर खान?“प्रिय अक्षय कुमार, मी लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. मला हा ट्रेलर खुप आवडला. मित्रा आता मी हा चित्रपटा पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. हा चित्रपट जर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असता तर वेगळीच मजा आली असती.” अशा आशयाचं ट्विट करुन आमिर खानने अक्षयला लक्ष्मी बॉम्ब चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post