१५ दिवस दशक्रिया विधी न करण्याचा पुरोहितांचा निर्णय

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - शहरातील अमरधाममध्ये होणार्‍या दशक्रिया विधी सोमवारपासून बंद करण्यात आले आहेत. पुरोहित मंडळाने हा निर्णय घेतला असून तो २९ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. अमरधाम येथे कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे.

अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणार्‍या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. यात एक-दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. सध्या जिल्ह्यात दररोज कोरोनाचे ७५० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. दररोज सुमारे १८ ते २० लोकांचा कोरोना आजाराने मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post