यंदा 'Bigg Boss-१४' मध्ये कोरोनामुळे नवे नियम?


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - छोट्या पडद्यावर ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या बिग बॉसच्या १४ व्या सीझनची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर बिग बॉसच्या घरात खूप सारे स्पर्धक एकत्र असणार म्हटल्यानंतर सुरक्षा व्यवस्था चोख आणि काही नियम लागू केले आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार, घरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल. आता घरामध्ये  कोणताही फिजिकल टास्क नसणार. आठवड्यात स्पर्धकांची कोरोना चाचणी केली जाईल. त्यामुळे स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घरात टास्क काय असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉसमध्ये काही बदल पहायला मिळणार आहेत. यंदा घरामध्ये डबल बेड नसणार. तसेच प्लेट, ग्लास शेअरिंग आणि बेडला परवानगी नसेल. यंदा कोणताही फिजिकल टास्क नसणार. प्रत्येक आठवड्याला स्पर्धकांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात येईल. स्पर्धकांसाठी मिनी थिएटर, मॉल रेस्टो उपलब्ध असणार आहेत.

बिग बॉसमध्ये कोणकोणते स्पर्धक असणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. परंतु, बडी मंडळींना शोमध्ये आणण्याचा निर्माते विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post