जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार
माय अहमदनगर वेब टीम
मंगळवार 21 सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : मोतिया| अंक : १
आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षाच नकाे. स्वावलंबन महत्वाचे राहील. प्रतिष्ठेस जपायला हवे.

वृषभ: शुभ रंग : लाल| अंक : ६
आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : २
काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
कौटुंबिक सुखात वृध्दी होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरूणांनी गैरवर्तन टाळावे.

सिंह :शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

कन्या : शुभ रंग : मरून|अंक : ३
नोकरीत बढती बदलीच्या बातम्या येतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : राखाडी|अंक : ५
व्यवसायात आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ४
आज हट्टीपणाने स्वत:चेच खरे कराल. तुमच्याकडून आज काही आपलीच माणसे दुखावली जातील.

धनु : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
काही दूरचे नातलग संपर्कात येतील. आज मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. प्रवास सुखकर होतील.

मकर : शुभ रंग : भगवा|अंक : ८
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : ६
कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीरीत्या हताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post