राजनाथ सिंहांचे पुत्र आमदार पंकज सिंह करोना पॉझिटिव्ह

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - नोएडा येथील भाजपचे आमदार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या करोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पंकज सिंह यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात अलेल्यांनी स्वतःला आयसोलेट करावं आणि करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे

'करोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांनंतर मी चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्क आलेल्या सर्वांनी कृपया स्वतःला अयसोलेट करावं आणि करोना चाचणी करून घ्यावी', असं पंकज सिंह यांनी ट्विट करून म्हटलंय. 


उत्तर प्रदेशात भाजप नेत्यांना करोनाचा संसर्ग सुरूच आहे. पंकज सिंग यांच्या आधी यूपी सरकारमधील मंत्री मोहसिन रझा हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले. मोहसीन रझा यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन रझा यांनी नागरिकांना केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post