नाश्त्याला पोहे खाण्याचे `हे` आहेत आरोग्यदायी फायदे

माय अहमदनगर वेब टीम

जेव्हा आपल्याला भरपूर भूक लागते, तेव्हा बऱ्याचदा कांदे पोहे तयार करण्याचाच विचार केला जातो. कारण हा पदार्थ झटपट तयार होणारा आणि आरोग्यासाठी पौष्टिक देखील आहे. सकाळच्या नाश्त्यासाठीही ‘कांदे पोहे’ या उत्तम पर्याय आहे. स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सामग्रींपासून कांदे पोहे काही मिनिटांमध्येच तयार होतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व जण आवडीने कांदे पोहे खातात. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे खाल्ले तर शरीराला कोणते लाभ मिळतात, जाणून घेऊया माहिती.

शरीराला मिळते भरपूर ऊर्जा 

नाश्त्यामध्ये कांदे पोहे खाणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. थोड्या थोड्या प्रमाणात पोहे खाल्ल्यास आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. पोह्यांमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असते. पौष्टिक नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात करण्यासाठी कांदे पोहे हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. 

​चविष्ट आणि पोषण तत्त्

कांदे पोह्यांच्या रेसिपीमध्ये आपण कित्येक प्रकारच्या भाज्या, शेंगदाणे आणि सुकामेव्याचाही वापर करतो. उदाहरणार्थ काजू, मनुके इत्यादी. या सामग्रीमुळे कांदे पोहे चविष्ट होतात आणि त्यातील पोषण तत्त्व देखील वाढतात. यासाठीच पोह्यांचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. पोह्यांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील कमी असते.

​शरीराचा आकार

या डिशमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. कांदे पोहे खाऊन तुम्ही दिवसाची सुरुवात केल्यास तुमचे वजन वाढणार नाही. सोबत तुमच्या आरोग्याला आवश्यक असणाऱ्या पोषण तत्त्वांचा पुरवठा देखील होतो. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि अँटी ऑक्सिडेंट्स जास्त प्रमाणात असतात. जर तुम्ही डाएट फॉलो करत असल्यास पोह्यांमध्ये शेंगदाणे मिक्स करू नका. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये पोह्यांचा समावेश करू शकता.

​पोट स्वच्छ राहते

पचन प्रक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पोहे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. कारण पोहे हा फायबरयुक्त एक हलका पदार्थ आहे. पोह्यांची पचन प्रक्रिया हळूहळू होते. यामुळे शरीरामध्ये दीर्घकाळापर्यंत ऊर्जा टिकून राहते. हे आतड्यांसह संपूर्ण पचन प्रक्रिया स्वच्छ करण्याचे कार्य करतात. बद्धकोष्ठतेची समस्या ही दूर होण्यास मदत मिळते. निरोगी आरोग्यासाठी पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्याच्या अन्य समस्या उद्भवू शकतात.

​शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते

पोह्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात आहे. याच कारणामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होण्यासही मदत मिळते. शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात लोहाचा पुरवठा होतो, तेव्हा रक्त प्रवाहाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी देखील वाढते आणि शरीर सक्रिय राहण्यास मदत मिळते.

​मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदाय

आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा किंवा करू नये, यावरून मधुमेहाचे रुग्ण नेहमीच गोंधळात असतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेही आपल्या आहारामध्ये पोह्यांचा समावेश करू शकतात. पोहे तयार करताना त्यामध्ये कमी प्रमाणात तेलाचा वापर करावा. सोबत हिरव्या भाज्यांचा जास्त प्रमाणात समावेश करावा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post