कोविड सेंटरच्या माध्यमातून चांगली मानवसेवा : विनोद तावडे

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - करोनामुळे आलेल्या संकटात सर्वसामान्य नागरिक मोठ्याप्रमाणात सापडले आहेत. महागड्या खाजगी हॉस्पिटल मधील उपचार त्यांच्या अवकाच्या बाहेर आहेत. अशा परिस्थितीत नगरमध्ये भारतीय जनता पार्टी, महापालिका व पंडित दीनदयाळ पतसंस्था यांनी पुढाकार घेऊन मध्ये सुरु केलेल्या मोफत कोविड सेंटरच्या माध्यमातून खरी मानवसेवा होत आहे. करोनाचे संकट संपेपर्यंत जास्तीजास्त मदत कार्य भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे व हे मानवसेवेचे कार्य चालूच ठेऊन सामन्यांना आधार द्यावा, अशी सूचना प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

भारतीय जनता पार्टी, महापालिका व पंडित दीनदयाळ पतसंस्था यांनी सुरु केलेल्या नटराज कोविड सेंटरला माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट देऊन कामाची माहिती घेतली. तसेच त्यांनी करोनावर मत केलेल्या रुग्णांना शुभेच्छा डिस्चार्ज दिला. याठिकाणी उपचाराने बरी झालेल्या एका चिमुरडीला तावडे यांनी जवळ बोलावून तिला बुके देवून निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी पालकमंत्री राम शिंदे, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गंधे, दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी,  जिल्हाप्रभारी मनोज पानगावकर, कोविड सेंटर प्रमुख पी.डी. कुलकर्णी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, आशिष अनेचा, महेश नामदे, शिवाजी दहींडे, मल्हार गंधे, निलेश चिपाडे आदि उपस्थित होते.

यावेळी वसंत लोढा म्हणाले, नगर शहरात करोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. प्रशासन प्रत्तेक करोना बाधितापर्यत पोहचू शकत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना या महामारीतून लवकरात लवकर बरे होण्यासाठी हे मोफत कोविड सेंटर सुरु केले आहे. आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी याठिकाणी उपचार घेतले आहेत. शेकडो बरे होवून घरी गेले आहेत. दानशूर व्यक्ती या सेंटरला मदत करत असले तरी अजून भरपूर मदतीची गरज याठिकाणी आहे.

प्रास्ताविकत महेंद्र गंधे यांनी नटराज कोविड सेंटरच्या माध्यमातून होत असलेल्या सेवकार्याची माहिती दली. मनपाचे डॉक्टर, भाजपचे महापौर, उपमहापौर, नगरसेवक, पदाधिकारी याठिकाणी लक्ष ठेवून रुग्णांना सुविधा व उपचारव मदत करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post