'एसबीआय'चे ठेवीदार आहात ; बँंकेने ठेवीदरात केली कपात

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँकेने  मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने २ कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर ०.२० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. ही व्याजदर कपात १ ते २ वर्ष मुदतीच्या ठेवीसाठी लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे. नवीन व्याजदर १० सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. याआधी बँकेने २७ मे रोजी मुदत ठेवीच्या दरात कपात केली होती. 

गेल्या महिन्यात बँकेने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा बँकेच्या ४४ कोटी हून अधिक ग्राहकांना होणार आहे. करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात सर्व सामान्य ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना यापुढे खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावे लागणार नाही. इतक नव्हे तर यापुढे बँक ग्राहकांकडून SMS शुल्क आकारणार नाही. हा नवा नियम बँकेच्या सर्व बचक खाते धारकांना लागू होणार आहे.बँकेने सर्व बचत खात्यांसाठी किमान शुल्क ठेवण्याचा नियम बदलला आहे. यामुळे ग्राहकांनी जर त्यांच्या खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post