मारुतीच्या कारवर या महिन्यात मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स
 माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - Maruti Suzuki India Limited आपल्या कारवर डिस्काउंट ऑफर केली आहे. यात कॅश डिस्काउंट सोबत एक्सचेंज बेनेफिट्सचा समावेश आहे. हे सर्व मॉडल कंपनीच्या अरेना डिलरशीपवर उपलब्ध आहेत. कंपनीने गेल्या काही महिन्यात आपल्या कारवर यासारखी डिस्काउंट ऑफर करीत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सप्टेंबर महिन्यात सुद्धा हा डिस्काउंट कायम ठेवणार आहे. 

मारुती सुझुकी एस प्रेसो 

या कारवर ४३ हजार रुपयांपर्यंत बेनेफिट्स मिळत आहे. यात २० हजारांचा कॅश डिस्काउंटचा समावेश आहे. तसेच २० हजार रुपयांचा एक्सचेंज बेनेफिट्स आणि ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट बेनिफिटचा समावेश आहे. 

मारुती सुझुकी सिलारियो 

मारुतीच्या या कारवर ४८ हजारांचा डिस्काउंट मिळत आहे. यात २५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट कंपनीकडून ऑफर केला जात आहे. ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट ही कार खरेदी केल्यानंतर मिळणार आहे. 

मारुती सुझुकी स्विफ्ट 

ही कार गेल्या महिन्यात सर्वात जास्त विकणारी कार आहे. या कारवर ३७ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यात १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट सोबत २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. तसेच २ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे. 

मारुती सुझुकी डिझायर फेसलिफ्ट 

गेल्या महिन्यात या कारची चांगली विक्री झाली होती. या महिन्यात या कार खरेदीवर ३७ हजार रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. यात १० हजारांचा कॅश डिस्काउंट, २५ हजारांचा एक्सचेंज बोनस आणि २ हजारांचा कॉर्पोरेट बोनस मिळणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post