अवघ्या तीन महिन्यांपूर्वी खासदार झालेल्या 'यांचे' निधन

 

माय अहमदनगर वेब टीम

बंगळूर - भाजपचे राज्यसभा खासदार अशोक गस्ती (वय ५५) यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांना श्वसनाचा तीव्र त्रास जाणवत होता. गेल्या जून महिन्यात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, इरण्णा कडाडी आणि अशोक गस्ती यांची राज्यसभेवर निवड झाली होती. 

ते मूळचे रायचूरमधील लिंगसुगूर येथील सविता समाजाचे नेते होते. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. १९९० पासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. बळ्ळारी आणि रायचूर भागात त्यांनी पक्ष संघटना केली होती. २००१ मध्ये रायचूर नगरपालिका सदस्य म्हणून निवडून आले. २०१२ मध्ये देवराज अर्स मागासवर्गीय विकास महामंडळ अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. भाजप युवा मोर्चा, वकील संघ, जिल्हा मुख्य सचिव अशा विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post