कार किंवा सायकल चालवताना मास्क घालणं आवश्यक आहे का?




माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - एकट्या व्यक्तीने गाडी चालवताना किंवा एकट्याने सायकल चालवताना मास्क घालावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना जारी केलेली नाही, अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली. पण समूहाने सायकलिंग, व्यायाम किंवा जॉगिंग करत आहात तर मग मास्क घालणं आवश्यक आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावं, असंही अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. 

वाहन चालवताना किंवा सायकल चालवताना मास्क घालणं बंधनकारक आहे का? असा प्रश्न विचारला गेला. त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी उत्तर दिलं. वाहन चालवताना मास्क न घातल्याने अलिकडेच शेकडो चालकांना दंड आकारण्यात येत होता. यासंदर्भात मोठ्या संख्येने तक्रारी वाढत होत्या. यावर भूषण यांनी स्पष्टीकरण दिलं. 'गाडी चालवताना किंवा एकट्याने सायकल चालवताना मास्क घालावा, अशी कोणतीही मार्गदर्शक सूचना सरकारने दिलेली नाही', असं भूषण यांनी स्पष्ट आहे.

'शारीरिक हालचालींवरून नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. नागरिक दोघे किंवा तिघांच्या गटात सायकल चालवताना किंवा जॉगिंग करताना दिसत आहेत. जर तुम्ही सायकल चालवत असाल किंवा समूहाने जॉगिंग करत असाल तर एकमेकांना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क घालावा आणि सोशल डिस्टन्सिंगही राखावं', असं भूषण यांनी सांगितलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post