दिल्ली कॅपिटल्सचा सुपर विजय, पंजाबचा युएईत पहिला पराभव; स्टोइनिसचा शेवटच्या षटकात झंझावात

 

माय अहमदनगर वेब टीम

स्पोर्ट्स डेस्क - युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने १३ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये राेहमर्षक विजयाची नाेंद केली. दिल्लीने आपल्या पहिल्याच सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर सुपर विजय संपादन केला. यंदाच्या लीगमधील हा पहिला सुपर आेव्हरमधील विजय ठरला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पंजाब संघानेही ८ गड्यांच्या माेबदल्यात १५७ धावा काढून सामना टाय केला. सामन्याचा निकाल सुपर आेव्हरमध्ये लावण्यात आला. यात दिल्लीचा संघ वरचढ ठरला.पंजाबचा युएईतील हा पहिला पराभव ठरला. दिल्लीने करिअरमध्ये दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...


दिल्लीसाठी कागिसो रबाडाची सुपर ओव्हर


चेंडू काय झाले

1 राहुलने 2 धावा काढल्या

2 राहुल आउट

3 निकोलस पूरन आउट

पंजाबसाठी मोहम्मद शमीची सुपर ओव्हर


चेंडू काय झाले

1 डॉट बॉल

2 1 धाव(वाइड बॉल)

3 ऋषभ पंतने 2 धावा काढल्या

नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. श्रेयसच्या नेतृत्वात खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची निराशाजनक सुरुवात झाली. पृथ्वी शाॅ (५) आणि शिखर धवन (०) ही भरवश्याची सलामीवीराची जाेडी सपशेल अयपशी ठरली. त्यापाठाेपाठ हेटमेयर (७) बाद झाला. अखेर कर्णधार अय्यर (३९),ऋषभ पंत (३१) व स्टाेइनिस (५३) यांनी झंझावाती खेळी केली.


सुपर ओव्हरचा थरार :


दिल्ली कॅपिटल्स संघाने सुपर ओव्हरमध्ये धडाकेबाज विजय नाेंदवला. सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हरचा निर्णय घेण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ३ चेंडूत २ बाद २ धावा काढल्या. दिल्लीच्या रबाडाने दाेन धावा देत त्यानंतर सलग दाेन चेंडूवर दाेन विकेट घेतल्या. तीन धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली संघाने बिनबाद लक्ष्य गाठले. ऋषभने दाेन धावांचे याेगदान दिले. गाेलंदाज शमी अपयशी ठरला.


मार्कस स्टॉयनिसनची तुफान फटकेबाजी


दिल्लीकडून खेळताना श्रेयस अय्यरने 37 आणि ऋषभ पंतने 31 धावा केल्या. अखेरीस मार्कस स्टॉयनिसने 21 तुफान फटकेबाजी करत 21 चेंडूत 53 धावा केल्या. दिल्लीचे 7 खेळाडूंनी दहाचा आकडा देखील पार करू शकले नाही. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने 15 धावा देत 3 बळी घेतले.


बिश्नोई ने डेब्यू मॅचमध्ये में 1 विकेट घेतली


सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन गडी बाद केले. शमीने शिमरॉन हेटमायर (7), पृथ्वी शॉ (5) आणि श्रेयस अय्यर (39) तंबूत पाठवले. पहिलाच सामना खेळणाऱ्या रवि बिश्नोईने एक गडी बाद केला. त्याने पंतला तंबूत पाठवले. .



दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवनला कृष्णप्पा गौतमने धावबाद केले.

शमीने पहिल्यांदा पावर-प्लेमध्ये एकापेक्षा जास्त गडी बाद केले


पंजाबने गत तीन सत्रात आपला सलामी सामना जिंकला आहे. अशात संघ आपला विजयी आलेख कायम राखू इच्छिते. पंजाबने लीगमध्ये सर्वाधिक 14 सामने दिल्ली विरुद्ध जिंकले. दोघांत आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. दिल्लीने 10 लढत नावे केल्या. गेल्या सत्रात दोघांनी एक-एक सामना जिंकला. दिल्लीने गत सत्रात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते, मात्र पंजाब टीम सहाव्या स्थानी राहिली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post