देशातील उद्योग आणि व्यवसायासाठीचे आर्थिक स्वातंत्र्य कमी झाले; पाहा भारताचे स्थान!

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात आता आणखी भर पडली आहे. जागतिक आर्थिक स्वातंत्र्य क्रमवारीत भारत २६ स्थानांनी घसरून १०५ स्थानावर पोहोचला आहे. ग्लोबल इकॉनॉमी फ्रीडम इंडेक्स २०२० मध्ये भारताच्या झालेल्या या घसरणीचा अर्थ देशात आर्थिक आणि व्यापारा संदर्भात स्वातंत्र्य आणि मोकळेपणा कमी झाला आहे. 

याआधीच्या म्हणजे २०१९च्या ग्लोबल इकॉनॉमी फ्रीडम इंडेक्समध्ये भारत ७९ स्थानावर होता. हा इंडेक्स कॅनडातील फ्रेजर इस्टीट्यूटने भारतातील थिंकटॅक सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीने मिळून प्रसिद्ध केला आहे. 

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हाँगकाँग आणि सिंगापूर या इंडेक्समध्ये अनुक्रमपे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर चीन भारतापेक्षा मागे म्हणजे १२४व्या क्रमांकावर आहे. या इंडेक्समध्ये न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, जॉर्जिया, कॅनडा आणि आयर्लंड सारखे देश पहिल्या दहामध्ये आहेत. 

जपान २०व्या, जर्मनी २१व्या, इटली ५१व्या, फ्रान्स ५८व्या, रशिया, ८९व्या तर ब्राझील १०५व्या क्रमांकावर आहे. ज्या देशांना सर्वात तळातील क्रमांक मिळाला आहे त्यामध्ये कांगो, झिम्बाब्वे, इल्जिरिया, इराण, सुदान, व्हेनेझुएला आदींचा समावेश आहे. 

भारताची क्रमवारी का घसरल

या रिपोर्टनुसार गेल्या एक वर्षात सरकारची आर्थिक स्थिती, संपत्तीचे अधिकार, जागतिक पातळीवरील व्यापाराचे स्वातंत्र्य, श्रम आणि अन्य कायदा या बाबत भारताची परिस्थिती खराब झाली आहे. 

हा रिपोर्ट २०१८च्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आला आहे. २०१८नंतर देखील भारताने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे पुढील वर्षात भारताची परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. या यादीत १६२ देश असून त्यांच्या अधिकार क्षेत्रात आर्थिक स्वातंत्र्य किती आहे याचे मुल्यांकन केले जाते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post