बाबो, अहमदनगरमध्ये कोरोना बाधित 25 हजारांच्या घरात



*आज नव्या ८५६ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३९ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४३८ आणि अँटीजेन चाचणीत २४५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९, संगमनेर ११, राहता १८,  पाथर्डी ०४,, नगर ग्रामीण २०, कॅंटोन्मेंट ०३,  नेवासा २३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२,  जामखेड १८, मिलिटरी हॉस्पिटल ०८  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४३८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६०, संगमनेर ३०, राहाता ४१, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर ६४,  कॅंटोन्मेंट ०७, नेवासा १६, श्रीगोंदा ०४,  पारनेर १८,अकोले ०५, राहुरी ४१,  शेवगाव ०३, कोपरगांव ०९, जामखेड ०२ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २४५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ४२, संगमनेर ०९, राहाता ४८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर २८, नेवासा १७, श्रीगोंदा १०, पारनेर ०७, अकोले २०, राहुरी ०३, कोपरगाव ०९, जामखेड १६ आणि कर्जत २६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५८१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १२४, संगमनेर ६८, राहाता ४६, पाथर्डी ४६, नगर ग्रा.०८, श्रीरामपूर ३८, कॅंटोन्मेंट १०,  नेवासा ४७, श्रीगोंदा ४०, पारनेर २२, अकोले ०६, राहुरी २४, शेवगाव १७,  कोपरगाव ३३, जामखेड २१, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २४७३१*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४३३९*

*मृत्यू:४४४*

*एकूण रूग्ण संख्या:२९५१४*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post