कोरोनाचे दिवसभरात ९६,५५१ नवे रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - जगभरात थैमान घालणा-या कोरोना महामारीचा देशातील विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे, तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात रेकॉर्डब्रेक ९६ हजार ५५१ रुग्णांची भर पडलीय तर एकाच दिवशी तब्बल १२०९ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत.

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या सहा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात आधिक आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या सहा राज्यात आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत एक हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २४ तासांत देशात ९६ हजार ५५१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३५ लाख ४२ हजार ६६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण इतर देशांपेक्षा चांगलं आहे. देशात सध्या ९ लाख ४३ हजार ४८० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात कोरोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख ५४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पाच ११ लाख ६३ हजार ५४२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post