..म्हणून मुळा निम्मे भरण्याच्या मार्गावर



माय अहमदनगर वेब टीम
भंडारदरा - उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात कालपासून श्रावणसरी जोरदारपणे कोसळू लागल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवार पाठोपाठ काल बुधवारी पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे धरणांत नव्याने पाण्याची आवक होत आहे.

भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.त्यानंतर रात्री पावसाचा जोर वाढला. त्यामुळे काल सायंकाळी 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात 5674 दलघफू पाणीसाठा झाला होता.

काल दिवसभरात 141 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने या धरणातील सायंकाळी साठा 5937 दलघफू झाला होता. 8300 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणातही 4245 दलघफू पाणीसाठा होता.

मुळा पाणलोटात हरिश्चंद्र गड, आंबित व अन्य भागात पाऊस जोरदार कोसळत असल्याने मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 1061 क्युसेकवर पोहचला होता. नदीत पाणी वाढल्याने मुळा धरणातही आवक होत आहे. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास मुळा धरण दोन तीन दिवसांत निम्मे भरेल. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 12283 दलघफू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post