CWC : 'त्या' एका पत्रावरून काँग्रेसमध्ये घमासान

 माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - काँग्रेसच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत सुरु आहे. नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये घमासान माजले आहे. २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. मात्र, मागणीच्या पत्रावर खासदार राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत. तसेच, पत्रामागे काँग्रेस नेत्यांची भाजपशी युती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला असल्याचा दावा करत काँग्रसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

आम्ही भाजप पक्षासोबत आहोत असे मत राहुल गांधी यांचे असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपावर सिब्बल यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.  

''राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाला यशस्वी केले. मणिपूरने भाजपाविरुद्ध संपूर्ण ताकदीने पक्षाचा बचाव केला. गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या बाजूने एकदाही विधान केलेले नाही. असे स्पष्ट करत सिब्बल यांनी असे असले तरी, आम्ही भाजपबरोबर संबंध जोडल्याचा आरोप राहुल गांधी करीत आहेत. असे सांगत सिब्बल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.''

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षनेतृत्वाच्या मुद्यावरुन सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात पक्षाचा संघर्ष सुरू असताना आणि सोनिया गांधी आजारी असताना हे पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विचारला आहे.

दरम्यान, सिब्बल यांचे यासंदर्भातील ट्विट आता ट्विटरवरून गायब आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post